मेलबर्न : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा दुखापतीमुळे ३ जानेवारी पासून सिडनी येथे सुरू होणा-या आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटीत खेळू शकणार नाही.
JUST IN: Trent Boult suffered a fracture to the second-metacarpal of his right hand and will return home to New Zealand at the end of the Test.
A replacement player will be confirmed in due course.#AUSvNZ pic.twitter.com/YWBybK5xoD
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2019
मेलबर्न येथील दुस-या कसोटी कसोटी दरम्यान फलंदाजी करताना मिशेल स्टार्कचा बाऊन्सर बोल्टच्या हातावर आदळला आणि त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असले तरी, दुखापत बरी होण्यास किमान चार आठवड्याचा कालावधी लागणार आहे. ज्या हाताला फ्रॅक्चर झाले त्या हाताने तो गोलंदाजी करत नसला तरी न्यूझीलंड संघासाठी हा मोठा धक्का आहे.
Boult was struck on the hand in the 53rd over.
Details on Boult's injury: https://t.co/ETV0kxuSRI#AUSvNZ pic.twitter.com/pp4i8qh3t6
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2019
दरम्यान, आॅस्ट्रेलियाने मालिकेतील दुसरा कसोटी सामना २४७ धावांनी जिंकला आहे. यासह आॅस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकून शेवट गोड करण्याचा न्यूझीलंड संघाचा प्रयत्न असणार आहे, पण त्याआधी बोल्टला झालेली दुखापत हा न्यूझीलंड संघासाठी धक्का आहे.