सिडनी : मार्नस लबुशेनच्या व्दिशतकाच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिस-या सामन्यात ४५४ धावांपर्यत मजल मारली. प्रत्युत्तर देताना न्यूझीलंड संघाचा पहिला डाव तिस-या दिवशी २५१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने दुस-या डावात तिस-या दिवसअखेर बिनबाद ४० धावा केल्या असून न्यूझीलंडवर एकूण २४३ धावांची आघाडी घेतली आहे.
Stumps at the SCG!
Australia finish the day on 40/0, extending their lead to 243, after bowling New Zealand out for 251.#AUSvNZ SCORECARD: https://t.co/Of7f25oYkN pic.twitter.com/UWVZTNynJz
— ICC (@ICC) January 5, 2020
कालच्या बिनबाद ६३ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडने आज १८८ धावांची भर घालत पहिल्या डावात सर्वबाद एकूण २५१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून फलंदाजीत ग्लेन फिलिप्सने ५२, टाॅम लाथमने ४९, टाॅम ब्लंडेलने ३४ आणि जीत रावलने ३१ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाकडून नाथन लायन याने ६८ धावा देत सर्वाधिक ५ तर पॅट कमिन्सने ४४ धावा देत ३ गडी बाद केले. मिशेल स्टार्कला १ गडी बाद करता आला.
Nathan Lyon picks up his fifth wicket and New Zealand are all out for 251.
The visitors are still 203 runs behind Australia's first-innings total.#AUSvNZ SCORECARD: https://t.co/Of7f25oYkN pic.twitter.com/rDo2adJgE8
— ICC (@ICC) January 5, 2020
पहिल्या डावात न्यूझीलंडला २५१ धावांवर गुंडाळत आॅस्ट्रेलियानं दुस-या डावात तिस-या दिवसअखेर बिनबाद ४० धावा करत पहिल्या डावातील २०३ आघाडीसह एकूण २४३ धावांची अशी भक्कम आघाडी घेतली आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा डेव्हिड वाॅर्नर २३ आणि जो बर्न्स १६ धावांवर खेळत होता.