नगर (प्रतिनिधी) – नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 50 टक्के मतदान केंद्रावर लाइव्ही चित्रीकरण (वेबकास्टिंग) करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रत्येक हालचालींवर 36 चित्रीकरण पथकाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती निवडणुक विभागाच्या वतीने देण्यात आली असून दोन्ही मतदारसंघातात एकूण 1 हजार 867 मतदना केंद्रावर वेबकास्टिंगची नजर राहणार आहे.
चेन्नई येथील आय नेट सिक्युअर लॅब या खासगी संस्थेबाबत वेबकास्टिंगचा करार करण्यात आला आहे. मतदान (दि.13) मे रोजी होणार आहे. तर मतमोजणी ही (दि.4) जून आणि निवडणुक प्रक्रिया 6 जून रोजी पूर्ण होणार आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
अकोले- 154, संगमनेर-139, शिर्डी-135, कोपरगाव-136, श्रीरामपूर-156, नेवासा-135, शेवगाव -183, राहुरी 154, पारनेर-183, नगर-143, श्रीगोंदा-172, कर्जत- जामखेड- 178 अशा मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.