सिडनी :– ऑस्ट्रेलियाची 49 वर्षीय धावपटू केली रुडीक एका नव्या विक्रमासाटी सज्ज बनली आहे. युजीन येथे होत असलेल्या 35 किलोमीटर अंतराच्या चालण्याच्या स्पर्धेत रुडीकला एंजेल गार्सिया या स्पेनच्या खेळाडूची कामगिरी मागे टाकण्याची संधी आहे.
स्पेनची रेस वॉकर एंजेल गार्सिया हिने 2019 साली दोहा येथे झालेल्या स्पर्धेत वयाच्या 49 व्या वर्षी सहभाग घेत पदक पटकावले होते. आता रुडिक युजीनमध्ये होत असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत वयाच्या 49 व्या वर्षी सहभाग घेणार आहे. तिचा ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघात समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेला 15 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेली रुडीक ही जगातील सर्वात वयस्कर धावपटू ठरली आहे. यापूर्वी तिने 2015 साली याच स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी कानाला झालेल्या दुखापतीमुळे तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.