दिल्ली– जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये 88.17 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर ‘नीरज चोप्रा’ याची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. मागील सात वर्षांमध्ये नीरज चोप्रा याने सात सुवर्णपदकावर नाव कोरलेय. नीरज चोप्रा सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूमध्ये गणला जातो. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णमय कामगिरी करणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला. तर रौप्य पदक पाकिस्तानच्या अरशद नदीमनं पटकावलं. अरशदनं 87.82 मीटरचा बेस्ट थ्रो करत रौप्य पदक आपल्या नावे केलं. नीरजच्या या कामगिरीनंतर त्याच्या आई-वडिलांनी देखील मीडियासमोर येऊन आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी नीरजच्या आईने पत्रकाराच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने साऱ्यांची मनं जिंकली आहेत.
नीरजनं एका पाकिस्तानी खेळाडूचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं, तुम्हाला कसं वाटतंय? यावर क्षणाचाही विलंब न लावता नीरजच्या आईनं स्पष्ट म्हटलं की, “हे बघा मैदानात उतरल्यावर अनेक खेळाडू असतात. सर्वच खेळण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी ना कोणी जिंकरणाच. मैदानावर सर्वच सारखे आहेत. त्यांच्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश असला तरीही काहीच गैर नाही. खरंच आनंदाची गोष्ट आहे की, तो पाकिस्तानी खेळाडूही जिंकला आहे.”
A reporter asked #NeerajChopra ‘s mother about how she feels about Neeraj defeating a Pakistani athlete to win gold.
His mother said : A player is a player, it doesn’t matter where he comes from, I am glad that the Pakistani player ( Arshad Nadeem) won as well.
This whole… pic.twitter.com/imk3ZHyLrC
— Roshan Rai (@RoshanKrRaii) August 28, 2023
नीरज चोप्रा काय म्हणाला होता?
“मी विचार करत होतो की, पात्रता फेरीनंतर मला स्वतःला अधिक पुश करावे लागेल. चांगले थ्रो करण्यापूर्वी किती दबाव असू शकतो, याची तुम्ही कल्पना करु शकत नाही. आम्हाला पात्रता फेरीतही तंत्रात किंवा वेगात किंवा थ्रोमध्ये काहीतरी अधिक पुश करावे लागले होते. पात्रता फेरीच्या दिवशी थ्रो देखील खूप चांगले होते आणि मधल्या काळात रिकव्हरी वेळ एक दिवस होता.
मग फायनलमध्ये अशीच कामगिरी करायचे दडपण असते. पण मला नेहमी वाटतं की, मी नेहमीच सर्वोत्कृष्ट थ्रो करू शकेन. ऑलिम्पिक पदकही खूप सुंदर आहे आणि आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमधले हे विजेतेपद खूप मोठे आहे.जर तुम्ही स्पर्धेच्या दृष्टीने तुलना कराल, तर ऑलिम्पिकपेक्षा जागतिक अजिंक्यपद नेहमीच खूप कठीण असते. माझ्यावर प्रेम करत असलेल्या सर्व भारतवासीयांचे आभार.”