मेलबर्न – टेनिस हंगामातील पहिली ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनला सोमवार(दि.16) पासून प्रारंभ होत आहे. यंदाची स्पर्धा अनेक अव्वल टेनिसपटूंसाठी महत्वाची असणार आहे. कारण, स्पर्धेत विजयी होणाऱ्या टेनिसपटूला एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्बियाचा नोवाक जोकोविच(4थे स्थान), नोर्वेचा कॅस्पर रुड(2 रे स्थान) आणि स्टेफानोस त्सित्सिपास(3 रे स्थान) या सर्वांना पहिल्या स्थानी पोचण्याची नामी संधी या स्पर्धेच्या रुपाने मिळणार आहे. या तिघांपैकी कोणालाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यास स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा पहिला क्रमांक अबाधित राहणार आहे.
IND vs SL । गिलचे शतक तर कोहलीची १६६ धावांची खेळी; श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर
यंदाच्या स्पर्धेतील विशेष गोष्ट म्हणजे, पुरुष टेनिसच्या इतिहासात सर्वोधिक ग्रॅंडस्लॅंम नावावर असणाऱ्या नोवाक जोकोविच(21 ग्रॅंडस्लॅंम) व राफेल नदाल(22 ग्रॅंडस्लॅंम) यांचा स्पर्धेतील सहभाग. दोघांचेही वय सध्या 30 वर्षांपेक्षा अधिक आहे. दोन्ही आघाडीच्या खेळाडूंसाठी सध्याची परिस्थिती व गट वेगळे असले तरी, उपांत्य फेरीपर्यंत आपापले सामने जिंकले तर ते अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. अशा परिस्थिती कोण बाजी मारते हे पाहणे अत्यंत उत्कंठावर्धक ठरेल. नदाल या स्पर्धेचा गतविजेता असून जोकोविचने तब्बल नऊ वेळा या स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे.
IND vs SL | कोहलीच्या ‘विराट’ शतकाने मोडला श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा मोठा विक्रम
जोकोविचचे पुनरागमन
गेल्या वर्षी ही स्पर्धा नोवाक जोकोविच सोबत झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे गाजली. करोनाची लस घेण्यास नकार देणारा जोकोविच स्पर्धेसाठी मेलबर्नमध्ये दाखल झाला खरा मात्र, त्याला विमानतळावरूनच ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यानंतर त्याने स्थानिक न्यायालयात देखील धाव घेतली परंतु, त्याला स्पर्धेत सहभागी होता आले नाही. यंदा मात्र आयोजकांनी त्याच्यावर कुठलेही निर्बंध घातलेले नाहीत. त्यात जोकोविच कमालीचा फॉर्ममध्ये असल्याने त्याला विजेतेपदाचा दावेदार समजले जात आहे.