BNP Paribas Open at Indian Wells Tennis Garden,California : इटलीच्या 20 वर्षीय लुका नार्डीने (Luca Nardi) आपल्या बालपणीचा आदर्श आणि अव्वल मानांकित 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) येथे बीएनपी पारिबा ओपनच्या (BNP Paribas Open) तिसऱ्या फेरीत 6-4, 3-6, 6-3 असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत 123व्या क्रमांकावर असलेल्या नार्डीने नंबर वन जोकोविचला हरवून मोठा उलटफेर केला. विजयानंतर त्याने आपले रॅकेट फेकले आणि आपल्या हातांनी आपला चेहरा झाकला. नंतर तो म्हणाला की, “हा चमत्कार आहे. मी फक्त वीस वर्षांचा आहे आणि मी क्रमवारीत शंभरहून अधिक स्थानावर आहे आणि मी नोव्हाकला हरवले.”
नार्डी हा ग्रँड स्लॅम किंवा एटीपी मास्टर्स 1000 स्तरावरील स्पर्धेत जोकोविचला पराभूत करणारा सर्वात खालचा क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. याआधी 122व्या क्रमांकावर असलेल्या केविन अँडरसनने 2008 मध्ये मियामीमध्ये त्याचा पराभव केला होता.
🚨😮 What an upset!
Italian Luca Nardi, ranked 123 in the world, has beaten Novak Djokovic in round three at Indian Wells.
The 24-time Grand Slam champion remains without a title in 2024. pic.twitter.com/Fg1shu7o4R
— DW Sports (@dw_sports) March 12, 2024
सोमवारी तिसऱ्या फेरीत जोकोविचला पराभूत करून नार्डीने सर्वांना आश्चर्यचकित केले. या पराभवासह जोकोविचचा स्पर्धेतील विक्रमी सहाव्या विजेतेपदावरील दावा संपुष्टात आला. जोकोविचने 2024 मध्ये अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. याआधी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला यानिक सिनरकडून उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
सामन्यादरम्यान जोकोविचचा नार्डी आणि अंपायरशी वादही पाहायला मिळाला. शॉटसाठी लागणारा वेळ यावरून त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, पंचांनी नार्डीची बाजू घेतली. या वादानंतरही जोकोविचला इटालियन खेळाडूचा पराभव करता आला नाही आणि नार्डीने कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.