मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच यानेही उपांत्य फेरीत प्रवेश केला. संभाव्य विजेता मानल्या जात असलेल्या जोकोवीचने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर फ्रीत्झ याच्यावर 7-6, 4-6, 6-2, 6-3 असा चार सेटमध्ये पराभव केला.
या सामन्यात फ्रीत्झने पहिला सेट गमावल्यावर दुसरा सेट जिंकत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, जोकोवीचच्या अनुभवापुढे तो कमकुवत ठरला. नंतरचे दोन्ही सेट जिंकत जोकोवीचने सामन्यातील विजयासह थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सर्बियन स्टार नोव्हाक जोकोविचने 11व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 24 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियनने मेलबर्न पार्कमधील सर्व 10 सेमीफायनल आणि फायनल जिंकले आहेत. तो 48व्यांदा ग्रँडस्लॅम उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
The 10x champion was tested in warm conditions on RLA 😰@DjokerNole advances to the semifinals for the 11th time at the AO 🇷🇸 🏆https://t.co/w157RNDVsj
— #AusOpen (@AustralianOpen) January 23, 2024
दरम्यान, याआधीच्या सामन्यात जोकोवीचने मनारीनोवर 6-0, 6-0, 6-3 अशी सरळ तिन सेटमध्ये मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. या विजयासह त्याने स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररच्या या स्पर्धेच्या इतिहासात सलग ३१ सामने जिंकण्याच्या कामगीरीची बरोबरीही केली.
Australian Open 2024 : कोको गॉफ उपांत्य फेरीत, अझारेन्काला मात्र पराभवाचा धक्का…
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत अमेरिकेची मानांकित महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मार्टा कोस्तयुकवर ७-६, ६-७, ६-२ अशी मात केली. या सामन्यातील विजयासह कोको हीने ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील सलग 12 व्या विजयाची नोंद केली.