IND vs SL – भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर सुरु असून सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळाची झलक दाखवली. सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाया मजबूत केला आणि त्यानंतर विराट कोहलीने आपल्या दमदार फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.
#AxarPatel | केएल राहुलनंतर अष्टपैलू अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात
विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील ४६वे तर या मालिकेतील दुसरे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धनेच्या विक्रमला मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करण्याच्या यादीत विराटने जयवर्धनेला मग सोडले आहे. दिग्गज खेळाडूंच्या या यादीत आता विराट कोहली पाचव्या स्थानावर आला आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने १९९८ ते २०१५ या कारकिर्दीत ४४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत . यामध्ये त्याने ३३.३७ च्या सरासरीने आणि ७९ च्या स्ट्राइक रेटने १२६५० धावा केल्या आहेत. जयवर्धनेने आपल्या कारकिर्दीत १९ शतके आणि ७७ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये जयवर्धने श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू राहिला आहे.
मात्र, सध्याच्या घडीला भारताचा विराट कोहली धावा फाटकावण्याच्या बाबतीत खूपच वेगाने धावताना दिसत आहे. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या १२५८८ धावा होत्या. त्यामुळे त्याला महेला जयवर्धनेला मागे टाकण्यासाठी ६३ धावांची आवश्यकता होती. विराट कोहलीने या सामन्यात दीडशतकीय खेळी करत जयवर्धनेला मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.
The average of Virat Kohli is ultimate. pic.twitter.com/xR5KcsKKA3
— Johns. (@CricCrazyJohns) January 15, 2023
Most International hundreds among active players:
1) Virat Kohli – 74*
2) David Warner – 45
3) Joe Root – 44
4) Steve Smith – 42
5) Rohit Sharma – 41— Johns. (@CricCrazyJohns) January 15, 2023