मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत अमेरिकेची मानांकित महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मार्टा कोस्तयुकवर ७-६, ६-७, ६-२ अशी मात केली. या सामन्यातील विजयासह कोको हीने ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील सलग १२ व्या विजयाची नोंद केली.
It doesn’t matter how you win 💪@CocoGauff advances to the AO semifinals for the first time ever 🇺🇸 👇https://t.co/AU4NfhghQj
— #AusOpen (@AustralianOpen) January 23, 2024
महिलांच्या एकेरीतल अन्य लढतीत अना कलिन्सकायाने जस्मिन पाओलिनीचा ६-४, ६-२ असा पराभव केला. क्विन वेन झेंगनेही आगेकूच करताना ओशेन डोडीनवर ६-०, ६-३ अशी मात केली. या स्पर्धेत आणखी एक मानांकित खेळाडू व्हिक्टोरीया अझारेन्काला मात्र, पराभवाचा धक्का बसला. तिला डाना यस्त्रेमस्काकडून ७-६, ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला.
Australian Open 2024 : बालाजी-कॉर्निया पुरुष दुहेरीत पराभूत….
पुरुष एकेरीत अल्कराझ गार्फिया याने मिमोर क्रेमानोव्हीकवर ६-४, ६-४, ६-० अशी मात केली. ह्युबर्ट ह्युकार्जने ऑर्थर सेझुकचा ७-६, ७-६, ६-४ असा पराभव केला.