Inter IT Cricket Tournament – इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या इन्फोसिस कप आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डॉइश बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संघांनी अनुक्रमे कॉग्निझंट व एफआयएस ग्लोबल या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज २ या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पंकज लालगुडे नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर डॉइश बँक संघाने कॉग्निझंट संघाचा २९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डॉइश बँक संघाने २० षटकात ३ बाद १८८ धावांचे आव्हान उभे केले.
यात पंकज लालगुडेने ४० चेंडूत ७ चौकार व २ षटकारासह नाबाद ६२ धावा केल्या. त्याला अनिल तेवानी ४९ धावा, सुमित फोपटे नाबाद ३७ धावा, मधु कामत ३१ धावा काढून साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना कॉग्निझंट संघाला २० षटकात ८ बाद १५९ धावाच करता आल्या. यात अर्पित राय २३, संदीप राज २२, पियुष पवार २१, राकेश चव्हाण १८, पुनीत करण १७ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
IPL 2024 Viewership : पहिल्या 10 सामन्यांमध्येच IPL 2024 ने तोडले सर्व व्यूअरशिपचे जुने रेकॉर्ड…
डॉइश बँक संघाकडून दिपक मेहतो (२-२८), अमोल माने (२-३१), सुमित फोपटे (१-१३), अनिल तेवानी (१-२८) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला २९ धावांनी विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात मिन्हज अली (३-२४) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संघाने एफआयएस ग्लोबल संघाचा ५ गडी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.