Australian Cricket player Bike Accident : क्रिकेट चाहत्यांचा सर्वात मोठा सण म्हणजेच आयपीएल सुरू होणार आहे. मात्र, जगातील ही सर्वात मोठी क्रिकेट लीग सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू दुखापतग्रस्त तर काही अपघातामध्ये जखमी झाले आहेत. गेल्या महिनाभरात तीन क्रिकेटपटूंचा (खेळाडू) रस्ता अपघात झाला आहे.
प्रथम, गुजरात टायटन्सने मोठ्या किमतीत करारबध्द केलेला युवा भारतीय खेळाडू रॉबिन मिन्झ बाईक अपघातात जखमी झाला. त्यानंतर श्रीलंकेचा लाहिरू थिरिमाने हा देखील कार अपघात जखमी झाला आणि आता ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बॅनक्रॉफ्ट दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात कॅमेरून बॅनक्रॉफ्टला ( Cameron Bancroft ) गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे तो गुरुवारपासून पर्थमधील WACA मैदानावर तस्मानियाविरुद्ध सुरू होणाऱ्या मार्श शेफिल्ड शील्ड फायनलमध्ये खेळू शकणार नाही. रविवारी दुचाकीवरून ( Cameron Bancroft Bike Accident ) जात असताना त्यांचा अपघात झाला. cricket.com.au वेबसाइटनुसार, बॅनक्रॉफ्टचे संघाबाहेर पडणे हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का आहे. कारण त्याच्या संघाला यंदा #SheffieldShield शिल्ड विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.
A huge loss for WA on the eve of the #SheffieldShield final with star opener Cameron Bancroft to miss the match with concussion.https://t.co/vpm6C0Gy4x
— cricket.com.au (@cricketcomau) March 19, 2024
बॅनक्रॉफ्ट याने या स्पर्धेत आतापर्यंत 42.51 च्या सरासरीने 3,061 धावा केल्या असून मागील पाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. शिल्ड स्पर्धेत 2023-24 हंगामात त्याने 10 सामन्यात 48.62 च्या सरासरीने 778 धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी तस्मानियाचा ब्यू वेबस्टर आहे. त्याने 10 सामन्यात 914 धावा केल्या आहेत.
बॅनक्रॉफ्ट या उजव्या हाताच्या फलंदाजाने गोलंदाज-अनुकूल ओव्हल खेळपट्टीवर व्हिक्टोरियाविरुद्ध दुस-या डावात 58 धावा करून दोन वेळच्या चॅम्पियनला (संघाला) निर्णायक स्थानावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, जिथे फक्त दोन इतर फलंदाज सामन्यात 50 धावसंख्येपर्यत पोहचले आहेत.
बॅनक्रॉफ्टची कर्णधार सॅम व्हाईटमॅनसोबतची सलामीची भागीदारी संघाला सलग तिस-यांदा अंतिम फेरीत पोहोचवण्याचे प्रमुख कारण ठरली. ही जोडी मोसमातील टाॅप-10 धावा करणाऱ्यांमध्ये एकमेव सलामीवीर म्हणून उदयास आली आहे.
याव्यतिरिक्त, बॅनक्रॉफ्ट ( Cameron Bancroft Bike Accident ) आणि व्हाईटमन या जोडीने अलीकडेच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी जेफ मार्श आणि माईक वेलेटा यांचा 3,470 धावांचा विक्रम मागे टाकला .बॅनक्रॉफ्ट आणि व्हाईटमन या सलामी जोडीच्या नावे आता एकूण 3,567 धावांची नोंद झाली आहे.