ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live Cricket Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज लखनौच्या एकना स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक 2023 चा 10 वा सामना खेळला जात आहे.आफ्रिकन संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता ऑस्ट्रेलिया विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला विजयाची मालिका सुरू ठेवायची आहे.
दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या शतकी आणि एडेन मार्करमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत सात गडी गमावून 311 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 106 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. तर एडन मार्करामने 44 चेंडूत 56 धावा केल्या. एके काळी दक्षिण आफ्रिकेचा संघ 350+ धावा करेल असे वाटत होते, पण एका षटकाच्या अंतराने मार्कराम आणि क्लासेन बाद झाल्यानंतर आणि डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीने त्यांना 320 धावांच्या आतच रोखले.
End of the innings – South Africa get 7-311 as Australia’s bowlers finished strongly #CWC23
— cricket.com.au (@cricketcomau) October 12, 2023
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली. बावुमा 35 धावा करून बाद झाला. यानंतर डी कॉकने रॅसी व्हॅन डर ड्युसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. डुसेनही 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डी कॉकने झंझावाती खेळी खेळली आणि 90 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 19वे शतक होते आणि या विश्वचषकातील सलग दुसरे शतक होते. डी कॉकने श्रीलंकेविरुद्धही 100 धावांची इनिंग खेळली होती.
डी कॉक आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळतो. असे असताना हे त्याचे घरचे मैदानही आहे. डी कॉकचा हा शेवटचा विश्वचषक आहे. यानंतर तो निवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत तो या स्पर्धेला खास बनवण्यात व्यस्त आहे. डी कॉकने 106 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. एडन मार्करमने 44 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. हेनरिक क्लासेनने 27 चेंडूत 29 धावा केल्या. डेव्हिड मिलर 17 धावा करून बाद झाला तर मार्को जॅनसेन याने 26 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.