IPL 2024 LSG Quinton De Kock : आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना झाला. लखनौने ( Lucknow Super Giants ) हा सामना 28 धावांनी जिंकला.
या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबी अवघ्या 153 धावांत गारद झाला. लखनौसाठी क्विंटन डी कॉकने 56 चेंडूत 81 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट 144.64 होता. त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 5 षटकार आले. यादरम्यान क्विंटन डी कॉकने 36 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले.
या काळात त्याने आयपीएलमध्ये तीन हजार धावाही पूर्ण केल्या. या लीगमध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आला आहे.
सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारे फलंदाज….
75 : ख्रिस गेल
80 : केएल राहुल
85 : जोस बटलर
94 : डेव्हिड वॉर्नर/फॅफ डुप्लेसिस
99 : क्विंटन डी कॉक
आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत क्विंटन डी-काॅकचा तिसरा क्रमांक लागतो. यामध्ये एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डुप्लेसिस (आरसीबी) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.
IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : मयंक यादवची घातक गोलंदाजी, लखनौचा ‘आरसीबी’वर रॉयल विजय…
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे द. आफ्रिकेचा फलंदाज…
एबी डिव्हिलियर्स : 170 डाव, 5162 धावा
फाफ डुप्लेसिस : 127 डाव, 4198 धावा
क्विंटन डी कॉक : 99 डाव, 3046 धावा
डेव्हिड मिलर : 118 डाव, 2791 धावा
जॅक कॅलिस : 96 डाव, 2427 धावा
जेपी ड्युमिनी : 77 डाव, 2029 धावा