हॅमिल्टन – न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने धावांचा पाठलाग करताना एका अनोख्या कामगिरीची नोंद केली. या संघाने भारताच्या राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा सलग 17 सामने जिंकण्याचा विक्रम मोडला व 18 वा विजय साकार करत नव्या विक्रमाची नोंद केली.
2018 सालापासून आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने मिळवलेला हा सलग 18 वा विजय आहे. धावांचा पाठलाग करताना सलग 17 विजय मिळवण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भारतीय संघाच्या नावावर होता. त्यावेळी भारतीय संघाने 2005-6 साली धावांचा पाठलाग करताना सलग 17 सामने जिंकले होते.