कोयनानगर (प्रतिनिधी) – कोयना पर्यटन क्षेत्राचा राज्य शासनाच्या माध्यमातून पर्यटनपूरक विकास होत असल्याने कोयना पर्यटनाने कात टाकायला सुरवात केली आहे. राज्याचे ऊत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कोयना पर्यटन विकास आराखडयाच्या माध्यमातून कोयना पर्यटनाच्या सौंदर्याला चार चाँद लावण्याचे काम सुरू झाले आहे.
संजय राऊत काश्मिरी पंडितांचे झाले कैवारी; मोदींवर पीओकेवरून साधला निशाणा
विधात्याला पडलेलं सुंदर स्वप्न असा निसर्गरम्य परिसर म्हणुन कोयना परिसराची ख्याती आहे. थंड हवेचे ठिकाण असणारा हा परिसर अल्पावधीतच वीकेंड डेस्टिनेशन म्हणून नावारुपाला आला आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी कोयना परिसराला प्रादेशिक पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन निसर्गरम्य ठिकाणे विकसित कऱण्यासाठी शासनाकडून १८ कोटी रूपयांचा कोयना पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच माणूस, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विदेशातील ‘तो’ किस्सा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पर्यटन आराखड्याची अंमलबजावणी कोयना परिसरात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून नेहरू उद्यान विकसीत करणे ,कोयना परिसरात निसर्ग परिचर केंद्र उभारणे, पर्यटकांना ठिकठिकाणी बसण्यासाठी आसनव्यवस्था या छोट्या छोट्या बाबींबरोबर कोयनानगर येथे थ्रीडी कारंजा उभारणे व नवीन पर्यटनस्थळ विकसित करणे या गोष्टींचा समावेश आहे.
नेहरु उद्यानात वाघ, बिबटे, अस्वल, हरीण, रानगवा, सांबर या वन्यप्राण्यांची प्रतिकृती बसवून नयनरम्य असणारे नेहरू उद्यान आकर्षक केले आहे. कोयनानगर येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी थ्रीडी कारंजा उभारण्यात आला आहे. १८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा कारंजा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.पर्यटकांना आकर्षित कऱण्यासाठी कोयनानगर येथे नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्याने कोयना पर्यटनाचा लूक बदलला आहे. कोयना पर्यटनाची विविध कामे कऱण्यासाठी आर्किटेक्चरची नेमणूक करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे कोयना पर्यटनाला अच्छे दिन आले आहेत.