#AusOpen : प्रज्ञेशचा पात्रतेच्या अखेरच्या फेरीत प्रवेश

मेलबर्न : भारताचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रतेच्या अखेरच्या फेरीत प्रवेश केला आहे. प्रज्ञेशने पात्रतेच्या दुस-या फेरीत जर्मनीच्या यानिक हँफमनचा १-६, ६-२, ६-१ असा पराभव केला.

अखेरच्या फेरीत प्रज्ञेशचा सामना अर्जेंटिनाच्या फेडरिको काॅरियाशी होईल. दुसरीकडे भारताच्या सुमीत नागलला मात्र पात्रतेच्या दुस-या फेरीत इजिप्तच्या महंमद सफ्वातने ७-६(२), ६-२ असा पराभव केला.

दरम्यान, प्रज्ञेशने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या  हॅरी बाॅर्शिएरचा ६-२, ६-४ असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.