शांतनिकेतनमधील हल्ला प्रकरणात दोघांना अटक

कार्यकर्ता नेमका कोणाचा? प्रत्यक्ष ग्राऊंड रिपोर्ट

कोलकाता : रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमध्ये लोखंडी रॉड आणि काठ्या घेऊन हिंसाचार माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे दोघे अभाविपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तर अभाविपने हे दोघे तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.

शांतीनिकेतनमधील विश्‍व भारती विद्यापीटात लोखंडी रॉड घेऊन घुसलेल्या एका जमावाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाचे खासदार स्वपन दसगुप्ता यांच्या व्याख्यानाला विरोध केला होता. अभाविपनेच हा हल्ला घडवल्याचा आरोप अनेक विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार अचिंत बागडी याच्या नेतृत्वाखाली 10 ते 15 जणांचा जमाव ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे होस्टेल विद्या भवनवर हल्ला केला. त्यांनी दासगुप्ता यांना घेराव घालणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुर्वी दम दिल्या प्रमाणे मारहाण करण्यास सुरवात केली.

मी आणि अन्य दोघांवर या गुंडांनी लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी हल्ला चढवला. मी ज्यावेळी त्यांच्या तावडीतून सुटून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी रस्त्यावरही माझा पाठलाग केला. सुरक्षा रक्षक हा प्रकार पहात होते. मात्र त्यांनी काहीही केले नाही, असे या हल्ल्यात जखमी झालेल्या स्वप्ननील या विद्यार्थ्याने सांगितले.

अंगशुक मुखर्जी मुखर्जी या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लेखोरांना विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंचा पाठींबा होता. बागडी हा कुलगुरू विद्यूत चक्रवर्ती यांचा निकटवर्तीय आहे. पाऊस मेला मैदान स्वच्छ करत असताना आम्ही त्या दोघांना एकत्र पाहिले आहे. हे हल्लेखोर रूग्णालयातही पोहोचले होते. होस्टेलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी सोडले नाही.

याबाबत दोन व्हिडिओ क्‍लिप व्हायरल होत आहेत. त्यातील एकात बागडी आणि त्याचे सहकारी विद्यार्थ्यांचा पाठलाग करत आहेत. त्याला अडवण्याचा प्रयत्न विद्यापीठाचे अधिकारी सुदेब प्रातीम बासू हे अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्यात पाठलाग करत असताना सुरक्षा रक्षक हताशपणे पहात असल्याचे दिसत आहे.

अचिंत बागडी आणि त्याचा सहकारी.
अचिंत बागडी आणि त्याचा सहकारी.

पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना बेलापूर न्यायलयात हजर करण्यात आले. त्यांना नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

या दोघांनी ते तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. मात्र तृणमूलने हा दावा फेटाळून लावला आहे. बागडी हा आमचा पुर्वी कार्यकर्ता होता. मात्र अलीकडे तो अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असल्याचे विश्‍वभारतीचे अध्यक्ष आणि तृणमूलचे नेते देवव्रत सरकार यांनी म्हटले आहे.

विश्‍वभारतीतील अभाविपच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी बागडीचे तृणमूलच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले आहेत. अटकेपुर्वी बागडी म्हणाला, मी तृणमूल सोबत आहे. माझ्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मारले होते. तो रुग्णालयात उपचार घेत आहे. पक्षाने जर माझ्याशी असलेले संबंध नाकारले असतील तर मला काय म्हणायचे नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.