#U19CWC : विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज

केपटाउन : १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे असून स्पर्धा कालावधी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी असा असेल. पाच उपखंडातील १६ संघ या १३ व्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले अाहेत. या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत.

स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले असून या संघाची अ (भारत,जपान, न्यूझीलंड,श्रीलंका), ब ( आॅस्ट्रेलिया,इंग्लंड, नायजेरिया,वेस्टइंडिज),क(बांगलादेश, पाकिस्तान, स्काॅटलंड,झिम्बाब्वे), ड( अफगाणिस्तान,कॅनडा,दक्षिण आफ्रिका, यूएई) अशा ४ गटात विभागणी केली आहे. गटातील दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होतील. यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होतील.

भारताने ही स्पर्धा सर्वाधिक ४ वेळा जिंकली आहे. भारताला पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी असून याआधी भारताने साल २०००,२००८,२०१२ आणि २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तसेच २००६, २०१६ मध्ये भारत उपविजेता ठरला आहे.

स्पर्धेत भारताचा पहिला सामना १९ जानेवारीला श्रीलंकेविरूध्द, दुसरा सामना २१ जानेवारीला जपानविरूध्द तर तिसरा सामना २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरूध्द रंगणार आहे.

भारतीय संघ : प्रियम गर्ग (कर्णधार), अथर्व अंकोलेकर, यशस्वी जैस्वाल, आकाश सिंग, शुभांग हेगडे, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, रवी बिश्नोई, शाश्वत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिध्देश वीर, दिव्यांश जोशी.

Leave A Reply

Your email address will not be published.