David Warner Record : मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ११ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना होता. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने तुफानी फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नरने 22 चेंडूत पन्नास धावा केल्या. त्याचवेळी या कांगारू सलामीवीराने 36 चेंडूत 70 धावा केल्या. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र, डेव्हिड वॉर्नरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
David Warner is off to a flyer in the #AUSvWI T20I!
Watch live on Kayo or Fox Cricket. pic.twitter.com/xVIjlD2xlL
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2024
खरं तर, डेव्हिड वॉर्नर तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या 100व्या सामन्यात पन्नास धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे. आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटीत द्विशतक झळकावले. यानंतर त्याने त्याच्या 100 व्या वनडेमध्ये शतक झळकावले. आता, त्याने आपल्या 100 व्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पन्नास धावांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे.
AUS vs WI 1st T20 : ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय; वेस्ट इंडिजचा 11 धावांनी केला पराभव…
दरम्यान, होबार्टच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 202 धावाच करता आल्या.