Australia vs West Indies 2nd Test Highlights : ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अत्यंत रोमांचक झालेल्या या कसोटीत कॅरेबियन संघाने 8 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य होते, पण कांगारूंचा संघ केवळ 207 धावांवरच मर्यादित राहिला. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी सादर करत कसोटी जिंकली. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज संघाने तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी जिंकली आहे.
स्टीव्ह स्मिथची शानदार खेळी, पण पराभव टाळता आला नाही…
ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियन परतत होते. मात्र, स्टीव्ह स्मिथने एका बाजूने संघाचा डाव सावरला. स्टीव्ह स्मिथ 146 चेंडूत 91 धावा करून नाबाद परतला. मात्र ऑस्ट्रेलियाचा पराभव त्याला टाळता आला नाही. कांगारू अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, मात्र याशिवाय इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ लक्ष्यापासून 8 धावा दूर राहिला.
How good is Test cricket! #AUSvWI
— cricket.com.au (@cricketcomau) January 28, 2024
शेमर जोसेफसमोर कांगारू फलंदाजांनी टेकले गुडघे…
वेस्ट इंडिजसाठी शेमार जोसेफ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शेमार जोसेफने 7 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय अल्झारी जोसेफला 2 यश मिळाले. जस्टिन ग्रेव्हजने 1 बळी घेतला. वेस्ट इंडिजकडून जोसेफने या सामन्यात एकूण आठ विकेट घेतल्या. आणि त्याला सामनावीर आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले.
Windies skipper Kraigg Brathwaite calls out former Aussie quick Rodney Hogg after a win for the ages at the Gabba #AUSvWI pic.twitter.com/OMENyIW7rf
— cricket.com.au (@cricketcomau) January 28, 2024
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कॅरेबियन संघाचा जबरदस्त पलटवार…
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजने आठ धावांनी जिंकला आहे. वेस्ट इंडिजनेही रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजने 311 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट्सवर 289 धावा करून पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 193 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कांगारू संघ केवळ 207 धावा करू शकला आणि सामना आठ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत कॅरेबियन संघाचा पराभव केला होता, पण ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
🎙️ “The West Indies have created the most amazing thing here in the world of cricket.”#WTC25| #AUSvWI 📝: https://t.co/NejxA1uZAr pic.twitter.com/iwNjAPxiqv
— ICC (@ICC) January 28, 2024
विडींजने 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात जिंकली कसोटी…
वेस्ट इंडिजने 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियात शेवटचा विजय 1997 मध्ये पर्थ येथे झाला होता. कांगारू संघाने दिवस-रात्र कसोटी सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सलग 11 दिवस-रात्र कसोटी सामने जिंकले होते.
गाबा मैदान हा ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य किल्ला मानला जातो. मात्र, 2021 मध्ये भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता आणि वेस्ट इंडिजनेही अशीच कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे 1988 पासून ऑस्ट्रेलियाने या मैदानावर फक्त तिसरीच कसोटी गमावली आहे. 1988 मध्ये वेस्ट इंडिजने त्यानंतर 2021 मध्ये भारताने पराभव केला होता आणि आता वेस्ट इंडिजने (2024) पुन्हा पराभूत केले आहे. आता गाबाचा अभिमान पूर्णपणे मोडला आहे.