बेलेरिव्ह(होबार्ट) – मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ११ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे. होबार्टच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१३ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ २०२ धावाच करता आल्या. अँडम झाम्पाने बॉलसह सर्वात महत्त्वाचे योगदान दिले आणि कांगारू संघाच्या विजयात ३ बळी घेतले.
A run-fest in Hobart but the Aussies take a 1-0 series lead #AUSvWI pic.twitter.com/BAkVJV5pl3
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2024
२१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स या जोडीने वेस्ट इंडिजच्या संघाला शानदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या ६ षटकात बिनबाद ७२ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर, ८९ धावांच्या धावसंख्येवर, वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का चार्ल्सच्या रूपाने बसला, जो ४२ धावांची इनिंग खेळल्यानंतर झम्पाचा बळी ठरला.
यानंतर, ११५ धावसंख्येपर्यंत वेस्ट इंडिजने ३ विकेट गमावल्या होत्या, ज्यात ब्रेंडन किंगचा समावेश होता. या सामन्यात किंगने ३७ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५३ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिज संघाच्या मधल्या फळीला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे संघाने १६३ धावांपर्यंत ८ विकेट गमावल्या. येथून जेसन होल्डरने ३४ धावांची नाबाद खेळी खेळली पण तो आपल्या संघाला ११ धावांच्या पराभवापासून वाचवू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून झाम्पासह मार्कस स्टॉइनिसने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, शॉन अबॉट आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
SL vs AFG : पथुम निसांकाने रचला इतिहास, श्रीलंकेसाठी वनडेत द्विशतक करणारा ठरला पहिला फलंदाज…
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 बाद 213 धावा केल्या. संघाकडून सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने 36 चेंडूंत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 70 धावांची शानदार खेळी केली. वॉर्नरचा हा 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता