नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्यातीलऔरंगाबाद शहराचे नाव शहेनशहा औरंगजेब यांच्या नावावरून पडल्याने या शहराचे नाव बदलून आता ते संभाजीनगर करण्यात आले आहे औरंगजेबाचा मोठा भाऊ असलेला दारा शुकोववर मात्र केंद्रातील भाजप सरकार मेहेरबान झाले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाराला सच्चा मुसलमान आणि भारतीयत्वाचा प्रतिनिधी असल्याचे प्रमाणपत्र दिले असून देशातील पाच विद्यापीठांमध्ये दाराबाबत संशोधन करण्यात येणार आहे.
2017 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक चमनलाल यांच्या स्मृती दिन कार्यक्रमात प्रथम दाराचा उल्लेख करण्यात येऊन त्याला सच्चा मुसलमान असे म्हणण्यात आले होते आणि दाराबाबत संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर 2019मध्ये भाजपतर्फे याबाबत पुढाकार घेण्यात आला आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि जामिया इस्लामीया विद्यापीठ या दोन विद्यापीठांमध्ये दाराबाबत संशोधन सुरू करण्यात आले आहे.
आणखीन तीन विद्यापीठांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत मोलाना आझाद नॅशनल युनिव्हर्सिटी दिल्ली युनिव्हर्सिटी आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी या विद्यापीठांमध्ये सुद्धा याबाबत काम लवकरच सुरू होणार आहे यासाठी काही तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे इतिहासावर नजर टाकली असता औरंगजेब नेहमीच जुलमी आणि हिंदुद्वेषी असा शहेनशहा होता त्याचा मोठा भाऊ असलेला दारा शुकोह मात्र धर्मनिरपेक्ष होता त्याने हिंदू उपनिषदांचे उर्दूमध्ये अनुवाद करण्याचेही काम केले होते त्यामुळे औरंगजेबपेक्षा त्याच्या मोठ्या भावाची प्रतिमा जर मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून समोर आली तर भारतामध्ये चांगले वातावरण निर्माण होईल अशी भाजपला अपेक्षा आहे.