मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ हे पहिले सॉंग रिलीज झाले आहे. या गाण्यात रणबीर आलियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान दिसत आहे. हे गाणे पाहता, या गाण्याचा बहुतांश भाग बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिराभोवती चित्रित करण्यात आल्याचे दिसते. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
याआधी रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या निमित्ताने ‘केसरिया’ गाण्याचा ऑडिओ टीझर रिलीज झाला होता आणि आता तीन महिन्यांनंतर पूर्ण गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात दोघे बनारसच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेताहेत.हे गाणं चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
‘ब्रह्मास्त्र’ हा एक सायफाय कल्पनारम्य चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर पत्नी आलिया ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मौनी रॉय चित्रपटात नकारात्मक भूमिकेत आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान देखील या चित्रपटात कॅमिओ करणार आहे.