पुणे- शहरात एकीकडे करोनाग्रस्तांच्या वाढत्या रुग्णसंख्येने धडकी भरवली असताना, औंध-बाणेर प्रभाग हद्दीत सध्या एकही ऍक्टिव्ह करोनाग्रस्त नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. यापूर्वीच्या माहितीनुसार या परिसरात एकूण 4 करोनाबाधित होते. मात्र, लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी आणि अन्य उपायांद्वारे या परिसराने करोनावर मात केल्याचे आशादायी चित्र पालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
पुण्यातील प्रभागनिहाय करोनामुक्त नागरिक
भवानी पेठ- 288, कसबा-विश्रामबागवाडा- 116, ढोले पाटील रस्ता-249, हडपसर-मुंढवा-33, बिबवेवाडी-39, धनकवडी-103, वानवडी-रामटेकडी- 56, शिवाजीनगर-184, वारजे-कर्वेनगर-8, सिंहगड रोड- 10, येरवडा-कळस-धानोरी-154, कोथरूड-बावधन- 4, औंध-बाणेर- 4, नगररोड-वडगावशेरी- 47, कोंढवा-येवलेवाडी-22 याप्रमाणे नागरिक करोनामुक्त झाले आहेत.