खळबळजनक ! कोल्हापुरात पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर – महाराष्ट्र पोलीस दल काही दिवसांपासून विविध घटनांमुळे चर्चेत आहे. त्यातच आता कोल्हापुरातील एका पोलीस निरीक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वारणा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे कोल्हापूरमधील पेठ वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, त्यांची अचानक बदली करण्यात आली. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे नाराज असल्याची चर्चा आहे. तडकाफडकी बदली केल्यानेच नाराज असलेल्या प्रदीप काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, अशी प्राथमिक माहिती कळते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांची काही दिवंसापूर्वीच तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ही बदली होताच त्यांनी सोशल मीडियात एक पोस्टही लिहिली होती. या पोस्टच्या माध्यामातून त्यांनी आपली खदखद व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.