नवी दिल्ली – करोना व्हायरसवरील लस उपलब्ध झाली आहे. अर्थ मंत्रालयातील पात्र अधिकाऱ्यांना ही लस उपलब्ध करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी ही लस वेळीच घ्यावी यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व अधिकाऱ्यांनी शक्य तितक्या लवकर घ्यावी असे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांनी ही लस घ्यावी यासाठी सीतारामन यांनी आवाहन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने लस मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व मंत्रालयानी प्रयत्न करण्याची सूचना केलेली आहे.
त्यामुळे इतर मंत्रालयातही लसीकरणाची मोहीम वेगात चालू आहे. सरकारी कार्यालयातील पात्र व्यक्तींचे लसीकरण झाल्यानंतर आगामी काळात सरकारी कार्यालयाचे कामकाज सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान भारतात पुरेशी लस उपलब्ध असून लसीचा तुटवडा आजिबात उपलब्ध जाणवू दिला जाणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत उत्पादित लस कमी पडली तर आयातीचा पर्याय खुला ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.