पुणे – पुर्व वैमनस्यातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेण्यात आले. ही घटना दिनांक 23 सप्टेंबर रोजी पावणेदहाच्या सूमारास दरिपूलाच्या पूढे असणा-या पेट्रोलपंपाजवळ घडली
याप्रकरणी नऱ्हे येथे रहाणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलाने तक्रार दिली होती. त्यानूसारय अभिषेक अनिरूध्द लोंढे(19,रा.नऱ्हे) , आकाश तानाजी शिंद(25,रा.खेडशिवापूर) यांना अटक करण्यात आली.त्यांच्यासोबतच्या इतर 3 ते 4 जणांविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीस रात्री पावणेदहाच्या सुमारास गाठले. त्याला जीवे ठार मारण्याच्या उददेशाने त्याचे डोक्यावर व पाठीवर कोयत्याने वार करून डाव्या पायाला दगडाने मारहाण केली. तसेच चेह-यावर लाथा बूक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचा तपास चालु असताना तपाथ पथकांतील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड यांना खबर मिळाली की गुन्हयातील आरोपी हे सातारा येथे पळून गेलेले आहे. त्याप्रमाणे तपास पथकांचे दोन पथक तयार करुन त्यांना साताराय येथून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन साथीदारही मिळून आला. त्यानेही गुन्हयात सहभागी असल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले, रविं रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांनी केली आहे.प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत.