नॉयडा – उत्तरप्रदेशातील ग्रेटर नॉयडा येथे दाट धुक्यामुळे समोरचा रस्ता नीट न दिसल्याने एक कार रस्त्यावरून उलटून थेट कॅनाल मध्ये कोसळली. या दुर्घटनेत सहा जण ठार झाले असून त्यात दोन बालकांचा समावेश आहे. या मोठ्या कार मध्ये एकूण अकरा प्रवासी होते असे सांगण्यात येते. त्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमाराला हा अपघात झाला.
दानकौर भागातील खेरली कॅनाल मध्ये ही गाडी कोसळली. चालकाला धुक्यामुळे समोरचा रस्ता नीट न दिसल्याने हा अपघात झाला असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. अपघातील सर्व जण संभळ जिल्ह्यातील रहिवासी असून ते दिल्लीकडे जात असताना हा अपघात घडला. ठार झालेल्यांची ओळख पटली आहे.