वॉशिंग्टन :- अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हिमवादळामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या 34 झाली आहे. अमेरिकातील 48 प्रांतामध्ये या वादळामुळे सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच अमेरिकेच्या पूर्वेकडील भागामध्ये नाताळच्याच दिवशी वीजपुरवठा खंडीत झाला होता.
तापमान वजा 18 अंशांपर्यंत घसरल्यामुळे त्यामुळे हजारो नागरिकांचा नाताळ कुडकुडणाऱ्या थंडीतच साजरा झाला. रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
कॅनडाजवळील ग्रेट लेक्सपासून ते मेक्सिकोच्या सीमेवर रियो ग्रान्द इथपर्यंत हिमवादळ पसरलेले आहे. गोठवून टाकणाऱ्या थंडीचे इशारे देण्यात आले आहे. काही प्रमुख शहरांमध्ये नाताळच्या काळातील गेल्या अनेक दशकांमधील सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे. अमेरिकेच्या मोंटाना राज्यात वजा 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कॅनडाचा, ब्रिटीश कोलंबियापासून ते न्यूफाऊंडलॅंडपर्यंतचा बहुतांश उर्वरित भाग अतिशय थंडीच्या थंडीच्या तडाख्यात सापडला असून हिमवादळाचे इशारे सर्वत्र देण्यात आले आहेत.