नगर -शिर्डी विधानसभा मतदार संघातील 11 लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतून 2 लाख 20 हजार रुपयांची मदत मंजुर झाली आहे. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना या रक्कमेच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या वैयक्तिक लाभ योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदार संघाने नेहमीच आघाडी घेतली आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ नागरीकांना होण्यासाठी आ. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरु असतो. त्यामुळेच योजनेचा लाभ सामान्य माणसांना सातत्याने मिळत आहे.
राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी 11 कुटुंबियांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत. या प्रत्येक कुटुबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य या योजनेतून मिळाले आहे. प्रातिनिधीक स्वरुपात योजनेतील लाभार्थ्यांना आ.विखे यांच्याहस्ते लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात या अनुदान रकमेचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी मंडलआधिकारी बी.डी जाधव उपस्थित होते.