शिंदे वासुली- वासुली ग्रामपंचायत हद्दीतील किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीने महाळुंगे पोलीस चौकीसाठी संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्ची व कपाट असे फर्निचर साहित्य सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांचेकडे सुपूर्द केले.
यावेळी किंग्फाचे मानव संसाधन व्यवस्थापक (एचआर मॅनेजर) राहूल कुंभारे, कार्यकरी अनिल शेकाडे, वासुलीचे पोलीस पाटील अमोल पाचपुते, महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वढेकर, कुदळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. चाकण एमआयडीसी टप्पा दोन मध्ये औद्योगिक वसाहत विकसित होत असताना मौजे वासुली, सावरदरी, भांबोली, वराळे आदी गावांमध्ये किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, टेट्रा पॅक, जीई, ब्रिस्टोन, हंट्समन, कॉर्निंग इंडीया, न्यू हॉलंड सारख्या सुप्रसिद्ध व नामांकित कपन्या आल्याने परिसरातील शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन सीएसआर फंडाच्या माध्यमातून गाव विकासाला चालना दिली.