शरद पवारांचे भावनिक ट्विट म्हणाले…

मुंबई- 2019 विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे.

तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक ट्विट केलं आहे. पवार म्हणाले, ‘या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे’. असं त्यांनी म्हंटल आहे.

तसेच, ‘महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, 10 वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे. असं देखील शरद पवार यांनी म्हंटल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.