पुणे : आसाम सरकारने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे छायाचित्र देत गुवाहाटी जवळील डाकिनी जंगल टेकड्यांचे परिसरातील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असल्याचे म्हटले आहे. हा दावा चुकीचा आहे.
वास्तविकता भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग आहे. आसाम सरकारच्या या दाव्यामुळे देशासह राज्यातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी आसाम सरकारचा निषेध केला आहे.
Aurangabad : “…म्हणून मी न्यायालयात बॉम्ब ठेवला आहे”; तपासणीनंतर अफवा असल्याचे झाले स्पष्ट
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर बाबत इतिहास आणि धार्मिक मान्यता अनादी काळापासून आहेत. या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा राज्यातील शिवभक्त, वारकरी व भाविकांना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा अॅड. तापकीर यांनी दिला आहे.