भेंडा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील भेंडा- गोंडेगाव- सलाबतपूर या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून दि.15 मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी भेंडा येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतले.
नेवासा तालुक्यातील भेंडा-गोंडेगाव-सलाबतपूर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून किमान चार वर्षे झालेली आहेत. वर्कऑर्डर सुद्धा त्याच वेळी झालेली आहे. केवळ ठेकेदाराची दिरंगाई व बेजबाबदारपणामुळे आजपर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही. जो रस्ता झाला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला असून ठेकेदाराने चार वर्षे होऊनही काम पूर्ण केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. ते काम पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचे निवेदन फुलारी यांना दिले होते. प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत उपोषण सुरुच राहिल, अशी भूमिका फुलारी यांनी घेतली होती.
दरम्यान, आज सकाळी फुलारी यांनी उपोषण सुरू केले. दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेवासा उपविभागीय अभियंता सुरेश दुबाळे यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन प्रशासन व ठेकेदार यांचेवतीने भेंडा- गोंडेगाव- सलाबतपूर या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून दि.15 मार्च अखेर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
मंत्रिमंडळ निर्णय : महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची अंमलबजावणी करणार
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कडूभाऊ काळे, अंकुश काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, डॉ. लहानु मिसाळ, दादा गजरे, डॉ. रावसाहेब फुलारी, डॉ. ईश्वर उगले, अण्णासाहेब गव्हाणे, बाळासाहेब क्षीरसागर, जनाभाऊ जाधव, डॉ.बाळासाहेब कोलते, यडूभाऊ सोनवणे, भारत साबळे, पिंटू वाघडकर, देवेंद्र काळे, गोरख फुलारी, संभाजी सोनवणे, विनायक मिसाळ, महेश नवले, जालिंदर मिसाळ यांचेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. भेंडा, गोंडेगाव, देवगाव, सौंदाळा, म्हसले, नजीक चिंचोली ग्रामस्थांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता.