बारामती (प्रतिनिधी) – ‘बारामती कोणी उभी केली हे जरा अंतर्मनाला विचारा..’ असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला नाव न घेता केला. बारामती येथे खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
मी जेवढी विकास कामे बारामतीत केली आहेत. तेवढी विकास कामे इथून पुढील काळात कोणताही आमदार करू शकणार नाही. शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले.
काहींनी अध्यक्षांची नेमणूक केली आहे. तालुका व शहर चे अध्यक्ष वकील आहेत. मात्र काम कोण करतो हे जनतेला सर्व माहित आहे. काही नग आसे आहेत. इकडे तिकडे करत आहेत. काहींचे कान भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असेही अजित पवार म्हणाले.
स्वच्छतेकडे लक्ष दे..! अजित पवारांना आईचा सल्ला
जमीन खरेदीच्या संदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार रजिस्ट्रेशन संदर्भात कोर्टात जावे लागले. मात्र तेथील परिसरात त्यांना अस्वच्छता आढळून आली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना तू बारामतीचा आमदार आहे.
सगळीकडे तुझे कौतुक करतात. बारामती न्यायालय परिसरात स्वच्छता आहे. त्याकडेही लक्ष दे असं सल्ला त्यांनी अजित पवार यांना दिला. हा किस्सा अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितला.