हांगझोऊ – चीनला ज्या तंत्रज्ञानाचा अभिमान होता, त्या तंत्रज्ञानाची हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत खिल्ली उडवली जात आहे. आतापर्यंत या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंसोबत असे तीन वेळा घडले आहे, जेव्हा त्यांना तांत्रिक बिघाडांमुळे किंवा तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे पेच सहन करावा लागला आहे. धावपटू ज्योती याराजीपासून ते भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि किशोर जेना याच्यासोबत चिनी अधिकाऱ्यांनी(पंच) मनमानी करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंच्या जिद्दीपुढे त्याचं काहीही एक चालू शकलं नाही.
तिघांनीही पदके जिंकून चिनी अधिकारी आणि तंत्रज्ञानाला चोख प्रत्युत्तर दिले. चीनने याराजीसोबत चाली खेळण्याचा प्रयत्न केला होता. याराजी या चिनी खेळाडूच्या चुकीमुळे हैराण झाली होती, मात्र याराजीच्या निषेधानंतर चिनी अधिकाऱ्यांनी तपास केला असता याराजी बरोबर असल्याचे आढळून आले. अन् तिच्या कांस्यपदकाचे रुपांतर रौप्यपदकात झाले.
ज्योति याराजी…
100 मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराजीला चुकीच्या पद्धतीने शर्यतीची सुरूवात केल्याने बाद करण्यात आले. तिच्या आणि एएफआयमधील वादानंतर ती केवळ खेळलीच नाही तर तिचे पदक कांस्यपदकातून रौप्यपदकात बदलले. नंतर चीन अॅथलेटिक्स असोसिएशनने याबद्दल माफी मागितली. त्या चिनी खेळाडूने याराजीची माफीही मागितली.
झाले असे की, चीनची खेळाडू वू यानीने चुकीच्या पद्धतीने शर्यतीची सुरुवात केली. तिने शर्यत सुरू होण्यापूर्वीच धाव घेतली, जी चुकीची ठरवण्यात आली. वू यानी आणि ज्योति याराजी एकमेकांच्या बाजुला उभा होत्या. पंचांनी दोघांची सुरुवात चुकीची असल्याचे सांगत त्यांना बोलावून घेतले.
याला भारतीय खेळाडूंनी कडाडून विरोध दर्शवला. यानंतर पंचांनी व्हिडिओच्या माध्यमातून तपासले असता वू यानी सुरुवात चुकीची ठरली आणि ज्योति याराजीला रौप्यपदक विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
निरज चोप्रा ….
तसेच भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू निरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांवर तसेच रेफ्रींवर संताप व्यक्त केला आहे.
निरजने जेव्हा अंतिम फेरीत पहिल्यांदा भालाफेक केली ते अंतरच तांत्रीक कारणामुळे मोजता आले नाही, असे आयोजकांनी सांगितल्याने थोडा वादही घडला होता. मात्र, त्यानंतरही निरजने अव्वल भालाफेक करत सुवर्णपदक निश्चित केले. मात्र, स्पर्धेचे आयोजन करताना अशा चुका कशा होऊ शकतात, असा संतप्त सवाल निरजने केला आहे. या स्पर्धेत निरजने सुवर्ण तर किशोर जेना याने रजतपदक पटकावले.
किशोर जेना…
बुधवारी, किशोर जेना याचा दुसरा थ्रो चूकीचा ठरविण्यात आला, परंतु तसे झाले नाही. जेनाच्या विरोधामुळे काही काळानंतर हा निर्णय बदलण्यात आला.
जेना यांच्या समर्थनार्थ आणि चिनी अधिकार्यांचा निषेध करण्यासाठी नीरज स्वतः पुढे आला. किशोर याने तेथे उपस्थित अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रिप्ले दाखवले असता, किशोरचा थ्रो फाऊल नव्हता आणि त्यानंतर चिनी अधिकाऱ्यानी (पंचांनी) आपला निर्णय मागे घेतला.