Asian Indoor Athletics Championships 2024 :- भारतीय धावपटू ज्योती याराजी हिने शनिवारी येथे आशियाई इनडोअर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ६० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकून स्वत:चा राष्ट्रीय विक्रम सुधारला.
२०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक विजेत्या ज्योतीने गेल्या वर्षी याच स्पर्धेत ८:१३ सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. तेव्हा ती उपविजेती ठरली होती. यापूर्वी, २४ वर्षीय ज्योतीने ८:२२ सेकंदांच्या वेळेसह अव्वल स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती.
फायनलमध्ये तिने जपानच्या असुका तेरेडा (८.२१ सेकंद) पेक्षा खूपच चांगली कामगिरी केली. तर हाँगकाँगच्या लुई लाई यिऊ (८:२६ सेकंद) हिने तिसरे स्थान पटकावले. ज्योती १०० मीटर अडथळा शर्यतीत सध्याची आशियाई मैदानी चॅम्पियन आहे. गेल्या वर्षी बँकॉकमध्येही तिने विजेतेपद पटकावले होते.