हांगझोऊ :- सात वेळच्या चॅम्पियन भारताने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष कबड्डी स्पर्धेच्या अ गटात थायलंडविरुद्ध 63-26 असा सहज विजय नोंदवला. 2018 मध्ये जकार्ता येथे कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाची नजर पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर आहे.
भारतीय संघाने चांगली सुरुवात करत हाफ टाईमपर्यंत 37-9 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या सुरुवातीला काही मिनिटांतच भारताने थायलंड संघाला प्रथमच ‘ऑलआऊट’ केले. भारताने लवकरच थायलंड संघाला दुसऱ्यांदा ‘ऑलआऊट’ केले. थायलंडचा प्रमोत सिसिंग हा शेवटचा खेळाडू होता आणि तो चढाईसाठी गेला तेव्हा भारतीय संघाने थायलंड संघाला तिसऱ्यांदा ‘ऑलआऊट’ केलं.
त्यानंतर भारताने उत्तरार्धात चौथ्यांदा थायलंडला ‘ऑलआऊट’ केले आणि 53-17 अशी आघाडी घेतली. थायलंडने दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण हा हाफ 26-17 असा जिंकून भारताने सामना जिंकला. मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने बांगलादेशचा 55-18 असा पराभव केला होता.
2️⃣ matches, 2️⃣ impressive wins 🔥#TeamIndia 🇮🇳 continue their dominance in Group A as they beat Thailand 🇹🇭
Follow the match updates on https://t.co/cfORnV9MAP and the Official Pro Kabaddi App 📲#RaidForGlory #TeamIndia #AsianGames2022 #Kabaddi #Hangzhou #AsianGames pic.twitter.com/6BJHGybBAk
— ProKabaddi (@ProKabaddi) October 4, 2023
दरम्यान, भारताच्या पुरुष व महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीत आगेकूच कायम राखली. पुरुष संघाने थायलंडचा 63-26 असा तर महिला संघानेही थायलंडचाच 54-22 असा पराभव केला. या स्पर्धेत कबड्डीत सातवेळा विजेतेपद मिळवलेला भारताचा पुरुष कबड्डी संघ यंदाही संभाव्य विजेताच मानला जात आहे. त्यामानाने महिला संघाची कामगिरी अनपेक्षित होती.
The UNSTOPPABLE Girls of 🇮🇳 Kabaddi💪🏻
The team adds another win to their list of glory, defeating 🇹🇭 54-22!
Great going girls! #AsianGames2022#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/W9BOHdPqgr
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
जकार्तामध्ये 2018 साली झालेल्या स्पर्धेतही भारतीय पुरुष संघाला सुवर्णपदकाची संधी होती. मात्र, त्यावेळी त्यांना ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले होते. आता हे दोन्ही संघ यंदाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.