इस्लामाबाद- आशियायी विकास बॅंकेने पाकिस्तानला 1,543 कोटी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. देशातील उर्जा विभागाबरोबर रस्ते, नागरी सुविधा आणि आरोग्य विषयाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी हे कर्ज पाकिस्तानला दिले जाणार आहे.
पाकिस्तानचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव असाद हयाउद्दीन आणि आशियायी विकास बॅंकेचे पाकिस्तानसाठीचे संचालक योंग ये यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
वित्तीय, तांत्रिक आणि प्रशासकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी 300 दशलक्ष डॉलर दिले जाणार आहेत.
खैबर पख्तुन्वा प्रांतातील पाच शहरातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 385 दशलक्ष डॉलर आणि सिकारपूर- राजनपूर या 222 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या दुहेरीकरणासाठी 235 दशलक्ष डॉलरचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याशिवाय सामाजिक सुरक्षा आणि दारिद्य्र निर्मूलनासाठीच्या एहसास कार्यक्रमासाठी 603 दशलक्ष डॉलर हे परिणाम निकषाच्या आधारावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
करोना विरोधी लसींच्या खरेदीसाठी आशियायी विकास बॅंकेने ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.
तेहरीक ए तालिबान पाकिस्तान सरकार 2018 मध्ये सत्तेवर आल्यापासून गेल्या 3 वर्षात परदेशातील सरकारे आणि वित्तीय संस्थांकडून 34 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याचे करार केले आहेत.