नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 145 रुपयांनी कमी होऊन 47,093 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 397 रुपयांनी कमी होऊन 60,498 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,787 डॉलर व चांदीचा दर 22.48 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, ओमायक्रॉनमुळे सोने-चांदी बाजारात सह विविध बाजारामध्ये आगामी काळामध्ये अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता आहे.