Sri lanka vs Bangladesh Asia Cup 2023 Super4 : आशिया कपमधील सुपर फोरमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला असून अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गतविजेत्या श्रीलंकेलाही विजयासह अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात 257 धावा केल्या आहेत. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 258 धावा कराव्या लागतील.
श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमाने सर्वाधिक 93 धावांची खेळी केली. कुसल मेंडिसनेही उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. पथुम निसांकाने 40 आणि कर्णधार शनाकाने 24 धावांचे योगदान दिले.
बांगलादेशकडून गोलंदाजीत हसन महमूदने तीन बळी घेतले. शरीफुल इस्लाम आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.