ICC ODI World Cup 2023 Bangladesh vs Sri Lanka Match Toss Update : विश्वचषकाच्या ३८व्या सामन्यात श्रीलंकेसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. त्याचे सात सामन्यांत चार गुण आहेत. त्याचबरोबर बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नवी दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंकन संघ प्रथम फलंदाजी करेल.
मुस्तफिजुर रहमान फिट नसल्याचे शाकिबने सांगितले. त्यांच्या जागी तंजीम साकिबचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेने दोन बदल केले आहेत. कुसल परेरा आणि धनंजय डी सिल्वा यांचे पुनरागमन झाले आहे. चमिका करुणारत्ने आणि दुशान हेमंथा यांना वगळण्यात आले आहे.