Asia Cup 2023 Ban vs Pak Super Four : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर फोर फेरीचा पहिला सामना आज खेळवला जात आहे. पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर फोरमध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात Toss जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 38.4 षटकात सर्वबाद 193 धावा केल्या असून पाकिस्तानसमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवलं आहे.
लाहोरच्या मैदानावर 194 धावांचे लक्ष्य पाकिस्तानसाठी फारसे अवघड असणार नाही. हा सामना जिंकून पाकिस्तानी संघ अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
बांगलादेशकडून फलंदाजीत मुशफिकर रहीमने सर्वाधिक 64 धावा केल्या तर कर्णधार शाकिबने 53 धावांची खेळी खेळली. मोहम्मद नईमने 20 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.
भारताविरुद्धच्या सामन्यात सर्व 10 बळी घेत इतिहास रचणाऱ्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी या सामन्यातही नऊ विकेट्स घेतल्या. हरिस रौफने सर्वाधिक चार तर नसीम शाहने तीन विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि फहीम अश्रफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इफ्तिखार अहमदलाही एक विकेट मिळाली.