Asia Cup 2023 Super4 India vs Sri Lanka :आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल.
भारतीय संघ आज सलग तिसऱ्या दिवशी मैदानात उतरणार आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना रविवारी दुपारी सुरू झाला, जो सोमवारी रात्री संपला. यानंतर टीम इंडियाला आज (मंगळवारी) श्रीलंकेसोबत सामना खेळायचा आहे.
भारत विरूध्द श्रीलंका सामन्यास दुपारी तीन वाजता सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(TOSS) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे.(India Won the Toss & elected to bat) कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दोन्ही संघाचे Playing 11 पुढीलप्रमाणे :-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
श्रीलंका- पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.
दरम्यान, श्रीलंकेतील उष्ण आणि दमट वातावरणात सतत क्रिकेट खेळणे कठीण आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी सोमवारी रात्री 19 षटके टाकली होती आणि आता पुन्हा आज त्यांना किमान 30 षटके टाकावी लागणार आहेत. भारतीय खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक असू शकते.