पॅरिस – जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीला डब्ल्यूटीएने वर्षातील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूचा बहुमान दिला. सलग दुसऱयांदा तिने हा मान मिळविला असून अमेरिकन ओपन चॅम्पियन एम्मा रॅडुकानूला वर्षातील सर्वोत्तम नवोदित खेळाडूच्या बहुमानासाठी निवडण्यात आले.
2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱया बार्टीने यावर्षी पाच अजिंक्यपद जिंकली. त्यात विम्बल्डन ग्रँडस्लॅमचाही समावेश आहे. तिचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद होते. अंतिम फेरीत तिने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा पराभव केला होता.
याशिवाय तिने मियामीतील जेतेपदही स्वतःकडेच राखले होते तर मेलबर्न, स्टुटगार्ट, सिनसिनॅटी येथील स्पर्धाही जिंकल्या. यामुळे तिसऱयांदा तिला वर्षअखेरीस अग्रस्थानावर राहता आले. 19 वर्षीय रॅडुकानूने अमेरिकन ओपन स्पर्धेत पात्रता फेरी पार करून उतरली होती आणि नंतर तिने या स्पर्धेचे जेतेपदही पटकावले.