#AsianOlympicQualifiers : मुष्टियुद्ध स्पर्धेत आशिष उपांत्यपूर्व फेरीत

Madhuvan

अमान (जॉर्डन) – भारताचा अव्वल मुष्टियोद्धा आशिष कुमार याने आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कर्गिस्तानच्या ओंबरीक बेकजाइचा 5-0 असा दणदणीत पराभव केला.

या स्पर्धेत आशिष कुमार 75 किलो वजनी गटात सहभागी झाला होता. त्याने चौथ्या मानांकित बेकजाइटला संपूर्ण लढतीत एकही संधी न देता स्पर्धेबाहेर फेकले.

उपांत्यपूर्व फेरीत आता आशिषचा सामना इंडोनेशियाच्या मायकेल मस्किटशी होणार आहे. या लढतीत जर आशिषने विजय मिळविला तर तो टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.