विंबल्डन – ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अॅश्ले बार्टी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (2019) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे.
दुसऱ्या सेटमध्ये कॅरोलिना प्लिस्कोवाने जरुर प्रतिकार केला. पण, पहिल्या आणि तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये सुरवातीला मिळालेली एकमेव ब्रेकची संधी बार्टीला विजेतेपदासाठी पुरेशी ठरली. विंबल्डनचे विजेतेपद मिळिवणारी बार्टी तिसरी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू ठरली.
यापूर्वी मार्गारेट कोर्ट (1963, 1965 आणि 1970), एव्हगनी कॉवली (1971 आणि 1980) या दोघींनी विजेतेपद मिळविले होते. बार्टीने तब्बल 41 वर्षांनी ऑस्ट्रेलियाकडे विजेतेपद खेचून आणले.
अंतिम लढतीमधील दुसरा सेट कमालीचा चुरशीचा झाला. सर्वोत्तम टेनिस याच सेटमध्ये बघायला मिळाले. बार्टीने पहिल्या सेटमधील झंझावात राखून4-0अशी आघाडी घेत एकतर्फी विजयाकडे वाटचाल केली होती. आठवी मानांकित प्लिस्कोवा दुसऱ्या सेटला पहिल्या तीन गेममध्ये एकही गुण मिळवू शकली नाही. दुसऱ्या सेटच्या 4-0 अशा आघाडीनंतर प्लिस्कोवाने बार्टीची सर्व्हिस प्रथमच ब्रेक केली.
पण, लगेच सहाव्या गेमला तिला आपली सर्व्हिस गमवावी लागली. अर्थात, जिगरबाज प्लिस्कोवाने जोरकस प्रतिकार करत बार्टीची सर्व्हिस पुन्हा ब्रेक करत सेट टायब्रेकमध्ये नेला. टायक्रेबला मात्र प्लिस्कोवाचे वर्चस्व राहिले.
अंतिम फेरीत काय होईल, या विचाराने मला काल रात्री झोपच लागली नाही. इव्होनी कावली यांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी साकारण्याची माझी इच्छा होती. आता जेतेपद मिळवल्याने मी आनंदी आहे. कॅरोलिना प्लिस्कोव्हाविरुद्ध खेळताना माझी खरी कसोटी लागली. – अॅश्ले बार्टी
दुसऱ्या सेटमध्ये दमदार खेळ करत प्लिस्कोव्हाने सामन्यात पुनरागमन केले. याही वेळी बार्टीने प्लिस्कोव्हाची सव्र्हिस मोडीत काढत 3-1 अशी आघाडी घेतली. पण प्लिस्कोव्हाने तिला चोख प्रत्युत्तर देत सामना 5-5 अशा बरोबरीत आणला.
त्यानंतर बार्टीने प्लिस्कोव्हाची आणि मग प्लिस्कोव्हाने बार्टीची सव्र्हिस भेदत दुसरा सेट टायब्रेकरमध्ये नेला. अखेर टायब्रेकरमध्ये प्लिस्कोव्हाने 4-2 अशी आघाडी घेत सामन्यात बरोबरी साधली.