बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित “काला’ चित्रपटाच्या माध्यमातून तो चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात बाबिलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यातच इरफान ने जगाचा निरोप घेतला होता. त्यांचा आठवणीत बाबील नेहमीच सोशलवर व्हिडियो शेअर करत असतो. तो नेहमीच सोशलवर ऍक्टिव्ह असून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत असतो.
View this post on Instagram
यावेळीही बाबीला मुस्लीम धर्मावरुन ट्रोल करण्यात आले मात्र त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे की,“मी सर्व धर्मांच्या आदर करतो. बायबल, भगवत गीता , कुराण तिन्ही गोष्टी वाचल्या आहेत. आता मी गुरु ग्रंथ साहेब वाचतोय.
View this post on Instagram
धर्माचा उपयोग आपण एकमेकांची मदत करण्यासाठी करायला हवा. हीच खरी धर्माची व्याख्या आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत त्यानं ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं.