‘जॅकलिन फर्नांडिस’चा टॉपलेस फोटोशूट; पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया

मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)


बॉलीवूड अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिसने  सोशल आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. जॅकलिन  सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

जॅकलिनने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत,   तिचा हा फोटोशूट बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने केले आहे. या फोटोत जॅकलिनचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘रोज सकाळी लवकर उठा. कारण जेव्हा इतर स्वप्न बघत असतील तेव्हा तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधत असाल,’ अशा आशयाचे कॅप्शन डब्बू रतनानीने दिले आहे.  सध्या या फोटोमुळे सोशलवर चर्चेत आली आहे.  या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

 

जॅकलिनचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. सध्या तिच्या फोटो शूटमुळे ती सोशलवर प्रचंड गाजली आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी ‘भूत पोलीस’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘किक २’ सारख्या सिनेमात दिसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.